चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा फोन करून एका मानसिक रुग्ण तरुणाने पोलिसांची चांगलीच धावपडू उडवली.
चाळीसगाव शहर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपासाद्वारे मोबाईल नंबरचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान फोन धारकाचे नाव विकास एकनाथ पाटील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली असून, त्याला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अशा प्रकारचे खोडसाळ कृत्य करू नये. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन चाळीसगाव पोलीसांनी केले आहे.