चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावातील तीन गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. दोघांना प्रत्येकी एक वर्षासाठी तर एकास दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. राहुल अण्णा जाधव व श्याम ऊर्फ अण्णा नारायण गवळी यांना प्रत्येकी एक वर्ष, तर तिसरा संशयित हैदरअली आसीफअली सय्यद,असे गुन्हेगारांचे नाव आहे. याबाबतचे आदेश चाळीसगाव उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी पारीत केले आहेत.
तिघांना जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्याकडे चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रांताकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची चौकशी होऊन तीनही जणांना हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार विनोद भोई, तुकाराम चव्हाण आदींनी केली.