TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सातपुड्यातील आदिवासी गावांना भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातपुड्यातील पाल, निमड्या, गारबर्डी, धरणपाडा या आदिवासी बहुल गावांना आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी संयुक्तरित्‍या भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाल, ता. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णालयातील रुग्णांना मिळणारे उपचार, आरोग्य सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधी आदिंची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांचेकडून जाणून घेतली. तर लसीकरण कक्षाची पाहणी करुन तेथील सोयीसुविधा, उपलब्ध लस, झालेले लसीकरण आदिंबाबतची माहिती मुख्य अधिपरिचारीका कल्पना नगरे यांचेकडून जाणून घेतली. लसीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्था बघून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता घ्यावयाची खबरदारी व काळजी याबाबत काही मार्गदर्शक सूचना देखील त्यांनी केल्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांच्या मदतीने ऑक्सिजन पाईपलाईन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. ग्रामीण भागात लसीकरण वाढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना केल्यात.

आदिवासी बहुल भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी जागृती व्हावी याकरीता डॉ. बारेला यांनी स्थानिक बोलीभाषेत तयार केलेली व्हिडिओ क्लिप बघून जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिका-यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्नीशा पाटील, डॉ. मिलिंद जावळे यांच्यासह आरोग्य व महसुल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पालसह गारबर्डी, निमड्या, धरणपाडा आदि गावांना भेट देऊन तेथील पाहणी केली. गारबर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आणि नरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी केली तसेच नरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेचीही पाहणी केली. तर निमड्या, गारबर्डी ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे आणि रेशनकार्डचे वाटपही जिल्हाधिकारी राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

धरणपाडा येथील ग्रामस्थांशी साधला संवाद

सुकी धरणपाडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. तेथील पात्र लाभार्थींना जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, सामाजिक अर्थ सहाय्य योजना यांचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. तसेच याठिकाणी गावठाण नसल्याने या ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असल्याने वन विभाग आणि सिंचन विभागाने समन्वय साधून याठिकाणी गावठाण निर्माण करुन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी महसुल, वन विभाग, आदिवासी विकास विभाग, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या गावातील नागरीकांना कोणत्याही प्रकारची अडचणी येवू नये याकरीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी राऊत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १५ कोरोनाबाधित, ६० झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

November 26, 2023

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 6 फेब्रुवारी 2025!

February 6, 2025

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी !

October 4, 2021

प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेने सराफाला घातला २७.५६ लाखांचा गंडा !

April 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group