चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण कार्यालयामार्फत मिळणाऱ्या मोफत योजना व सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे यांनी केले आहे. ते कोंगानगर येथे आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत पिवळे रेशनकार्ड व उसतोड कामगारांना नोंदणी अर्ज वाटप कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील भाजपा- सेना सरकारच्या माध्यमातून गोर गरीब जनता व गरजूंसाठी विविध योजना राबविल्या जातात, त्यामुळे आरोग्य, शिक्षण, शेती, व्यवसाय यासाठी आर्थिक मदत मिळते मात्र बऱ्याच नागरिकांचे आधार कार्ड, रेशनकार्ड नसल्याने तसेच असल्यास त्यात वेळोवेळी दुरुस्ती केली नसल्याने या योजनांचा लाभ घेता येत नाही. यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून “आमदार आपल्या दारी – शासकीय योजना पोहोचतील घरोघरी” हे अभियान राबविण्यात येत असून यात आधार कार्ड अपडेट, नवीन रेशनकार्ड, नाव कमी जास्त करणे आदी लाभ मोफत दिले जातात तसेच यासाठी लागणारे अर्ज, कागदपत्रे झेरॉक्स देखील मोफत करून दिली जाते, तरी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन पोपट तात्या भोळे यांनी केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष दादा पाटील, गावातील सरपंच रामदास राठोड, वाघळीचे उपसरपंच राजू आप्पा पैलवान, जामडीचे उपसरपंच संजय पाटील, रेशन दुकानदार अशोक नानकर, आमदार कार्यालयाचे कर्मचारी दिनकर राठोड, पवन देवरे, किरण मांडोळे, लक्ष्मण पाटील, ताराचंद बाबा, पदम पवार तसेच गावातील लाभार्थी उपस्थित होते. तत्पूर्वी चाळीसगाव तालुक्यातील लोन्जे व आंबेहोळ येथे देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयामार्फत मोफत रेशनकार्ड वाटप करण्यात आले.