नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरोग्य मंत्रालयानं शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत ४१ हजार ३२२ नवीन रुग्ण आढळळे आहेत तर याच काळात ४८५ रुग्णांचा मृत्यू झालाय. दिलासादायक म्हणजे गेल्या २४ तासांत ४१ हजार ४५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
भारतात एका दिवसात ४१ हजार नागरिक कोरोना संक्रमित आढळले तर विशेष म्हणजे जवळपास तेवढ्याच संख्येत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या ९३ लाख ५१ हजार ११० वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ५४ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरू आहे. भारतासहीत जगातील १८० हून अधिक देशांत कोरोनानं थैमान घातलेलं आहे. जगभरातील ६.१६ कोटींहून अधिक जणांना कोरोनानं गाठलंय. तर १४.४२ लाखांहून अधिक कोरोना संक्रमितांचा मृत्यू झालाय. कोरोना आकडेवारीत जगात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत करोनाचे एकूण १ कोटी ३० लाख ८६ जार ३६७ रुग्ण आढळलेत. यातील ७८ लाख ७४ हजार ०७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर २ लाख ६४ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ब्राझिलमध्ये ६२ लाख ३८ हजार ३५० रुग्ण आढळलेत तर १ लाख ७१ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू झालाय.
देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९३.६७ टक्क्यांवर पोहचला आहे. पॉझिटिव्हिटी रेट ३.५६ टक्के तर डेथ रेट १.४५ टक्के आहे. २७ नोव्हेंबर रोजी ११ लाख ५७ हजार ६०५ करोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १३ कोटी ८२ लाख २० हजार ३५४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.