धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी क्र. १३३ हनुमान नगर धरणगाव येथे आज संविधान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव बाल विकास विभागाचे सुपर वायझर प्रवीण तडवी व प्रभाग ६ चे नगरसेविका संगीता गुलाब मराठे तसेच म.पा. कर्मचारी दीपक वाघमारे, राधिका भालेराव, अंगणवाडी सेविका वंदना कंखरे, माया पवार उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन वंदना कंखरे यांनी तर आभार माया पवार यांनी मानले.