TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा उद्रेक : दिल्लीत आज रात्रीपासून लॉकडाऊन, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दिल्लीची परिस्थिती खूपच गंभीर आहे. गेल्या २४ तासांमध्ये २४ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीची आरोग्य व्यवस्था तणावाखाली आहे असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज रात्रीपासून (सोमवार -१९ एप्रिल) ते पुढील सोमवारपर्यंत (२६ एप्रिल) लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या लाटेला तोंड देत आहे. राज्यात २५ हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. नवी दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचा असाच वेग राहिला तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडू शकतात, असं केजरीवाल म्हणाले.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

अरविंद केजरीवाल यांनी पुढील सहा दिवसात आरोग्य यंत्रणा बळकट करणार असल्याचं सांगितले. येत्या सहा दिवसात बेडची संख्या वाढवली जाईल. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन, औषधे यांची व्यवस्था करणार आहोत. सर्व दिल्लीकरांनी २६ एप्रिलपर्यंत लावलेल्या लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावं. दिल्लीला सहकार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचं आभार असंही केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना हात जोडून विनंती केली. यावेळी हा केवळ सहा दिवसांचा लॉकडाऊन लावत आहोत, दिल्ली सोडून जाऊ नका, अशी विनंती केली आहे. नवी दिल्ली सरकार तुमची काळजी घेईल, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

अत्यावश्यक सेवा, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या सेवा, वैद्यकीय सेवा सुरु राहतील. लग्न समारंभामध्ये ५० लोकं उपस्थित राहू शकतात, त्यासाठी वेगळे पास देण्यात येणार आहेत. अधिकारी सविस्तर सूचना जारी करतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

जिल्हा परिषद जळगावतर्फे जगतराव दौलतराव पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लवकरच तुला मारले जाईल ; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

June 18, 2022

कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी ‘कृष्णकुंज’वर

November 11, 2020

जळगाव जिल्ह्यातील तिघा विद्यार्थ्यांचा रशियात बुडून मृत्यू !

June 7, 2024

जळगाव कृषी विज्ञान केंद्र येथे ग्रामीण युवकांसाठी कुक्कुटपालन -कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात !

October 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group