जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाची लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारला नियोजन केले आहे. देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी देशात कोविशील्ड, को- व्हॅक्सीन लशीना आपात्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच याबाबतची रंगीत चाचणी येत्या शुक्रवारी ८ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा रुग्णालयात होणार आहे.
जिल्ह्यात सुमारे १४ हजार आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना ही लस सर्वात अगोदर दिली जाणार आहे. येत्या ८ जानेवारीस कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम जिल्हा रुग्णालयात होईल. सकाळी आठ पासून रंगीत तालीम सुरू होईल. २५ जणांवर लसीकरणाची रंगीत तालीम होईल. आगामी ८ ते १५ दिवसात लसी जिल्ह्यात उपलब्ध होतील. जिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणासाठी तीन रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २५ वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना यावेळी बोलविले जाणार आहे. आलेल्या व्यक्तींचा अगोदर पोलिसांच्या निगराणीतून जावे लागेल. नंतर पहिल्या रूममध्ये त्यांची नोंदणी होईल. तेथे शिक्षक असतील. ते संबंधित व्यक्तींची नोंद करून ती वैद्यकीय क्षेत्रातीलच आहे याची खात्री करेल. त्याची माहिती फीड करेल. दुसरा कक्ष व्हॅक्सिनिशन रूम असेल. त्यात लशीकरण करण्याची तालीम होईल. तिसरा कक्षा निरीक्षण कक्ष असेल. त्यात अर्धा तास त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवून लशीचा त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे का किंवा नाही याची पाहणी केली जाईल. अर्धा तासानंतर संबंधितांना घरी सोडण्यात येईल.
केंद्र शासनाच्या सूचनेवरून कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा डेटा मागविण्यात आला होता. जिल्ह्यात कोरोना लसीकरण अगोदर आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना केले जाणार आहे. त्यासाठी डेटा जिल्हा रुग्णालयातर्फे संकलित केलेला आहे. जिल्ह्यात अजून कोविडची लस आलेली नसली तरी शासनाने जिल्हा रुग्णालयांना रंगीत तालीम घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी सकाळी आठ पासून जिल्हा रुग्णालयात लसीकरणाची रंगीत तालीम सुरू होईल.
















