TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर मिळणार : ना. गुलाबराव पाटील !

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळधीत विश्रामगृह व पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी (प्रतिनिधी) राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काही जण टीका करत आहेत. त्यांच्या टिकेले प्रतिटिकेने नव्हे तर कामातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिनांक २० रोजीच्या जिल्हा दौर्‍याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या दौर्‍यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाळधी येथील नियोजीत विश्रामगृहाचे भूमिपुजन करणार असून त्यांच्याच हस्ते महात्मा गांधी चौकात रिमोट कंट्रोलने तब्बल २२ कोटी रूपयांच्या आणि सौर उर्जेवर चालणार्‍या राज्यातील पहिल्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, कार्यकर्त्यांनी विरोधकांसोबत कोणतीही तडजोड न करता सडेतोड भूमिका घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले. तर, त्यांनी आततायीपणा करणार्‍या आपल्या काही समर्थकांचे कान देखील टोचले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मंगळवार दिनांक २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांच्या उपस्थितीत पाळधी येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुक्ताईनगरात भव्य सभा होणार आहे. याच्या नियोजनासाठी आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल सुगोकी जवळच्या फार्म हाऊसमध्ये नियोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा हा ऐतीहासीक पध्दतीत यशस्वी होणार असल्याचे प्रतिपादन केले. आपण मंत्री झाल्यानंतर मतदारसंघात येतांना ज्या प्रकारे अचूक नियोजन करून स्वागत करण्यात आले, अगदी त्याच प्रकारे अचूक नियोजन करण्याच्या सूचना ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या. तर, आपल्याला काही जण गद्दार म्हणत असले तरी आपण त्यांना कामातून उत्तर देणार असल्याचे सांगितले. काही कार्यकर्ते ही भोळेपणाने विरोधकांशी सलगी दाखवत असल्यामुळे बर्‍याचदा संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असते. यामुळे विरोधकांशी कोणत्याही स्थितीत कॉंप्रमाईज करू नका, त्यांना वेळ पडल्यास जशास तसे उत्तर द्या ! असे ना. गुलाबराव पाटील यांनी बजावले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. काही मंडळी हे सीझनल पुढारी असून ते आता सात वर्षांनी फिरू लागले असल्याची टीका त्यांनी केले. विरोधक टीका करत असले तरी त्यांची कुवत आपल्याला माहिती असल्याचा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी मारला. तर, काही जण दुटप्पी भूमिका घेत असल्याने ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बायपास रोडवरून पाळधी येथे येणार असून त्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. तर गावातील महात्मा गांधी चौकात त्यांच्या हस्ते २२ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात येणार आहे. सौर उर्जेवर चालणारी ही राज्यातील पहिली मोठी पाणी पुरवठा योजना आहे. यानंतर मुख्यमंत्री थोडा वेळ उपस्थितांना संबोधीत करतील. यानंतर पाळधीहून जळगावातील विविध चौकांमध्ये मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत होणार आहे. तर, भुसावळ येथून १-२ हजार मोटारसायकलस्वारांची रॅली त्यांच्या ताफ्यासोबत मुक्ताईनगर येथे जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची ही सभा ऐतीहासीक ठरणार असून याला जिल्हाभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून जळगाव ग्रामीणमधून देखील मोठ्या प्रमाणात समर्थक जाण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

मेळाव्यात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला आणि मतदार संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगतात डॉ.कमलाकर पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, भगवान महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी भक्कमपणे आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

बैठकिचे रूपांतर मेळाव्यात झाले. याजळगाव ग्रामीण मतदार संघाच्या मेळाव्याला माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उप तालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, धोंडू जगताप, रवींद्र चव्हाण सर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार , जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती जनाआप्पा पाटील, नंदलाल पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी, उपसभापती प्रेमराज पाटील, डॉ. कमलाकर पाटील, डी.ओ. पाटील, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, गोपाल जीभाऊ पाटील, भगवान महाजन , राजेंद्र पाटील, किशोर पाटील, तुषार महाजन, मुकेश सोनवणे, साहेबराव वराडे,
धरणगाव शहराचे गट नेते पप्पू भावे, नगरसेवक विजय महाजन, अभिजीत पाटील, वाल्मिक पाटील, हेमंत चौधरी, संतोष महाजन, बाळू गोलांडे, रवि कापडने, तोसिफ पटेल, भूषण पाटील, जितू नारखेडे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक , पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पं स तिचे माजी सभापती मुकुंदराव ननवरे यांनी केले. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी प्रास्ताविकात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दौरा विषयीची माहिती सविस्तरपणे विशद केली तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
Next Post

स्क्रीनशॉट शेअर केले तर पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही : केजरीवाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झाडाखाली थांबले, वीज कोसळली अन् अख्या कुटुंबासोबत घडलं भयंकर !

April 24, 2023

जि.प मराठी शाळेत मनसेच्या वतीने मराठी गौरव दिवस साजरा

February 27, 2022

मोठी बातमी : राज्यातील 24 महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश !

November 23, 2022

अल्पवयीन बालिकेवर नातेवाईक तरुणाकडून अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

September 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group