वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर आता छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या हत्येबाबत अमेरिकेच्या एका मासिकाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात दावा केला आहे. सिद्दीकी हे चुकून मारले गेले नाहीत, तर त्यांना शोधून तालिबान्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याचा दावा अमेरिकन मासिकाने केला आहे.
३८ वर्षीय दानिश सिद्दीकी एक फोटो पत्रकार म्हणून अफगाणिस्तानला गेले होते. दरम्यान तालिबान आणि अफगान सैन्यात सुरू असलेल्या युद्धाला ते कव्हर करत होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन एक्झामिनरच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सीमारेषेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला कव्हर करण्यासाठी सिद्दीकी अफगाणिस्तानच्या लष्कराच्या टीमसोबत स्पिन बोल्डक भागात गेले होते. या हल्ल्यादरम्यान सिद्दीकीला दुखापत झाली. त्यामुळे ते आणि त्यांची टीम एका स्थानिक मशिदीत आसरा घेण्यासाठी गेले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. पण एक पत्रकार मशिदीत असल्याची माहिती बाहेर येताच तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केला. सिद्दीकी आपल्या टीमसोबत मशिदीत आसरा घेत असल्यामुळेच तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केल्याचं स्थानिक तपासात समोर आलं आहे.
तालिबानने त्याला पकडले तेव्हा सिद्दीकी जिवंत होते, असे या अहवालात म्हटले आहे. तालिबानने सिद्दीकीची ओळख पटवली केली आणि नंतर त्याची आणि त्याच्या साथीदारांची हत्या केली.