धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील टहाकळी येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. हृदयद्रावक म्हणजे आईच्या मृत्यूनंतर बाळाचीही प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टहाकळी येथील मनोहर पाटील यांचा खेडी येथील वंदना पाटील यांच्याशी मागील वर्षी विवाह झाला होता. विवाहानंतर विवाहिता गर्भवती होती. दरम्यान, खोळ भरणीच्या कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विवाहिता वंदना पाटील यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सिझर होऊन तिने बाळाला जन्म दिला.
बाळाच्या जन्मानंतर वजन कमी भरले होते. तर दुसरीकडे वंदना पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वंदना पाटील यांचा मृत्यू झाला. अशातच बालकाला ही त्रास होऊ लागल्याने व त्याचे वजन कमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
















