फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, गोपाळ हरीचंद्र इंगळे याने यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीच्या मोबाईलवर फोन करुन शारीरीक सुखाची मागणी करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान, तरुणीने नकार दिला असता तुला ठार करील अशी धमकी देखील दिली. दुसरीकडे पिडीतेची बदनामी होईल असा आक्षेपार्ह मजकुर एका महिलेने व्हाटसअपवर प्रसारीत करुन बदनामी केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गोपाळ हरीचंद्र इंगळे व एक महिला अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका देवीदीस सुरदास करीत आहेत.