धरणगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते धरणगाव शहर कॉंग्रेसच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
दि. २८ (शनिवार) रोज़ी धरणगाव शहर कांग्रेस कार्यालयाचे उद्घाटन महाराट्रा प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी प्रदेश सचिव डी.जी. पाटील, शहर अध्यक्ष अनंत परिहार, तालुका अध्यक्ष व्हि.डी. पाटील, नंदलाल महाजन, रामचंद्र महाजन, गणेश सोनवने, गौरव चव्हाण, योगेश येवले, भूषण भागवत, युवक तालुक़ा अध्यक्ष रावसाहेब पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश भागवत, सम्राट परिहार, महेश पवार, राजेंद्र न्यायदे, सलीम दादा, रऊफ़ पठान, अतुल पटेल, गंगाराम सांळुखे, जयेश पारधी, रतिलाल चौधरी, सुनील बड़गुज़र, सुनील सोनार, बालू जैन, फ़ैसल शेख, विकी पारधी, किरण अत्तरदे आदि उपस्थित होते.