धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी प्रा.डी.आर पाटील यांची सहकार भारती या संस्थेच्या भारताच्या महामंत्रीपदी निवड झाल्याबद्दल धरणगाव तालुका मराठा प्रबोधनी संस्थेतर्फे त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी सुद्धा त्यांच्या मराठा प्रबोधनी संस्थेच्या बैठकीत ठराव करून सत्कार केला.
या प्रसंगी अध्यक्ष डॉ डी पी पाटील,भाजपाचे जेष्ठ नेते डी जी पाटील साहेब,भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी एम पाटील सर,इंदिरा कन्या विद्यालयाचे सचिव सी के पाटील,मराठा प्रबोधिनीचे संचालक विजय पवार,मोहन नाना पाटील,महेश पाटील,धनराज पाटील,प्रा किरण पवार,प्रा डी डी पाटील,भीमराज पाटील,आदर्श शेतकरी आनंदराव पवार आदी उपस्थित होते.