TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणे बाबत प्राप्त निर्देशानुसार या अभियानामध्ये धरणगाव शहरातील सर्व शाळांनी विविध जनजागृतीपर उपक्रम व प्रात्यक्षिक राबविले. याच अभियान अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार दि. 19 जुलै 2025 रोजी शहरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची “महास्वच्छता रॅली” आयोजित करण्यात आली.

महास्वच्छता रॅलीचा शुभारंभ धरणगाव नगरपरिषद कार्यालय येथे “स्वच्छ सर्वेक्षण- सफाई अपनाओ बिमारी भगाओ” असा संदेश असलेला हायड्रोजन बलून लावून मुख्याधिकारी रामनिवास झंवर व पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून निघून परिहार चौक, नेताजी रोड, महावीर चौक, मेन रोड बाजारपेठ, तेली तलाव, सोनवद रोड मार्गे आठवडे बाजार मैदानात आली. या रॅली दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता तसेच प्लास्टिक बंदी व अभियाना विषयी घोषणा देत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. या महास्वच्छता रॅलीत शहरातील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा, सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, पी आर हायस्कूल, आदर्श प्राथमिक शाळा, ॲग्लो उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद उर्दू शाळा क्र. 2, महात्मा फुले हायस्कूल अशा सर्व शाळांचे सुमारे 5000 विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांसह सहभागी झाले होते.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

आठवडे बाजार येथील मैदानात प्रा. व्ही. जी. पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकार केलेला “सफाई अपनाओ, बीमारी भगाओ” हा संदेश व बालकवी ठोंबरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक बंदी व स्वच्छतेबाबत सादर केलेला सजीव देखावा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यानंतर अभियानाच्या उद्देशावर आधारीत कचरा व्यवस्थापन विषयावर इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, हात धूणे बाबत जनजागृती यावर सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय व बालकवी ठोंबरे प्राथमिक विद्यालय, प्लास्टीक बंदी या विषयावर पी आर हायस्कूल, सफाई अपनाओ, बीमारी भगाओ या विषयावर आदर्श विद्यामंदीर तसेच धूम्रपान व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बाबत महात्मा फुले हायस्कूल यांनी एका हून एक सुंदर अशी पथनाट्ये सादर केली.

त्यानंतर या अभियानअंतर्गत दि. 01 जुलै ते 18 जुलै दरम्यान शालेय स्तरावर स्वच्छता विषयावर आधारित रांगोळी, चित्रकला, रंगभरण, निबंध, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे तसेच प्लास्टिक संकलन मोहिम स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना शाळानिहाय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदविणा-या शाळांच्या मुख्याध्यापकांचा देखील सन्मानपत्र व वृक्षरोप देवून पोलीस निरिक्षक सुनिल पवार व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसह स्वच्छतेची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आठवडे बाजार मैदान येथील आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. त्यावेळी शहरातील नागरींकांनी सहकार्य केल्यास शहर स्वच्छ होण्यास मदत होईल व त्याचे मुख्य माध्यम शाळेचे सर्व विद्यार्थी असतील तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग “धरणगाव शहर बदल रहा है“ हे दर्शवित आहे असे त्यांनी प्रास्ताविकात नमुद केले. यावेळी पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच धरणगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या 5000 विद्यार्थ्यांना खाऊ तसेच “स्वच्छ धरणगाव, सुंदर धरणगाव” असे नाव प्रिंट असलेले पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन किरण चव्हाण सर व परमेश्वर रोकडे सर यांनी केले तर किरण पाटील सर यांनी आभार मानले.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, यांच्या मार्गदर्शनाखाली भिकन पारधी कार्यालय अधिक्षक,आरोग्य निरीक्षक हैबतराव पाटील व संतोष बिऱ्हाडे,धनंजय कोठूळे पाणी पुरवठा अभियंता, राहूल तळेले विद्युत अभियंता, शिवाजी चव्हाण लेखा अधिकारी,शेख शमशोद्दीन, रामकृष्ण महाजन, आण्णा महाजन, सिकंदर पवार, निलेश वाणी, महेश चौधरी, मुझंमिल शेख यांचे सह सर्व नगरपरिषद व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaongulabrao patil

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
धरणगाव

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026
Next Post

वाहने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शहर पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त!

March 29, 2025

खा. उन्मेष पाटील यांचा सक्रीय सदस्यांच्या टॉप १० यादीत समावेश !

July 12, 2023

सावधान…गड किल्ल्यांवर मद्यपान ; मग तयार रहा `या` शिक्षा भोगायला ; शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय !

March 13, 2023

जळगावातील १६ व्यापारी संकुल उद्यापासून बंद राहणार

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group