धरणगाव (प्रतिनिधी) पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे गावातील नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी धरणगाव पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी धरणगाव पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून जनार्दन पवार यांच्याकडेच पुन्हा पदभार दिला आहे. यानिमित्ताने जितेंद्र महाजन यांच्या मागणीला यश मिळाले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याने जवळपास २०-२५ दिवस नागरिकांना पाणी पुरवठा झालेला नसल्याने शहरास टंकर द्वारा पाणी पुरावठा करण्यात आला होता. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून धरणगावचे मुख्याधिकारी यांना जिल्हा प्रशासन अधिकारीपदी प्रभारी नियुक्ती देण्यात आली होती. मुख्याधिकारी हे हप्त्यातून दोनच दिवस येत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरात नागरिकांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत होते. हि समस्या लक्षात घेता धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना पूर्ववत धरणगाव नगरपालिकेत पूर्णवेळ देण्यात यावे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी पदी नवीन नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी पदी नवीन नियुक्ती देण्यात आली असून सतीश दिघे हे जळगाव येथे रुजू झाले आहेत. अशी माहिती स्वतः दिघे यांनी जितेंद्र महाजन यांना दिली आहे. महाजन हे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी कामी हजर होते.
धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्याचा चार्ज देण्यात आला होता. आता त्याठिकाणी नवीन नियुक्ती झाल्याने मुख्याधिकाऱ्यांना धरणगाव साठी पूर्णवेळ देता येईल. नगरपालिकेचा अंदाधुंद कारभार, बोकाळलेला भ्रष्टाचार, नागरिकांच्या मूलभूत समस्या, मुख्यत्वे पिण्याच्या पाण्याची समस्या आदी लक्षात घेता धरणगाव न.पा.चे मुख्याधिकारी धरणगाव नगरपालिकेकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवतील हीच आशा व्यक्त करतो. . . जितेंद्र महाजन, माहिती अधिकार कार्यकर्ता.
















