धरणगाव (प्रतिनिधी) माझी वसुंधरा अभियान 5.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत धरणगाव नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती कार्यशाळेचे उद्या (दि. 31) रोजी आयोजन करण्यात आले आहे.
धरणगाव नगरपरिषदतर्फे पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती नगरपरिषद मार्फत पुरविली जाणार आहे. ही कार्यशाळा शनिवारी रोजी सकाळी 11:00 ते 2:00 वाजेपर्यंत असणार आहे. तरी या कार्यशाळेला जास्तीत जास्त नागरिकांचा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन धरणगाव नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. तसेच या कार्यशाळेसाठी येताना लाकडी पॅड, पाणी बॉटल, छोटी वाटी, पेन्सिल, पेपर, आणि एक रुमाल सोबत आणण्याचे देखील नगर परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.