धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचे पोलीस निरीक्षक पवनकुमार प्रतापराव देसले यांच्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा तीर्थ वेले तालुका चोपडा येथे त्यांचे पोलीस हवालदार श्री.सुधीर चौधरी यांनी स्वतःहून बेवारस व मनोरुग्ण दिव्यांग बांधवांना शनिवार रोजी जेवण दिले. विशेष म्हणजे हवलदार सुधीर आनंदा चौधरी यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना न सांगता साहेबांच्या आई गं.भा.रेखाबाई प्रतापराव देसले ( चिंचखेडे ता. जि.धुळे) यांच्या नावाने स्वखर्चातून हे जेवण देऊन साहेबांना वाढदिवसाची भेट दिली त्यामुळे धरणगावचे पोलीस हवालदार सुधीर आनंदा चौधरी यांचे कौतुक होत आहे.