धरणगाव (प्रतिनिधी) १ जानेवारी २०२१ रोजी संपन्न झालेल्या “पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीमध्ये” गावातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. धरणगाव येथील सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल मधील इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थांनी देखील या पर्यावरण जनजागृती रॅलीत सहभाग घेतला होता, या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १ जानेवारी २०२१ वार – शुक्रवार रोजी धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत “पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण वाचवा, सृष्टी वाचवा असा सकारात्मक संदेश देण्यात आला. पर्यावरण जनजागृती रॅलीत गावातील सर्व प्रमुख शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील इयत्ता ९ वी , १० वीच्या विद्यार्थांनी देखील सहभाग नोंदवला होता. आज महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे छोटेखानी कार्यक्रम घेऊन सहभागी विद्यार्थांना व शिक्षक हेमंत माळी, पी.डी. पाटिल, व्ही.टी.माळी यांना सन्मानपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम. के. कापणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार व उपस्थित सर्व शिक्षक बंधु – भगिनी यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक हेमंत माळी यांनी केले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार, एम.बी.मोरे, एस.व्ही. आढावे, एस.एन.कोळी, सी.एम.भोळे, हेमंत माळी, पी.डी.पाटील, व्ही.टी.माळी, व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे.महाजन, लिपीक जे.एस. महाजन, पी.डी.बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, जीवन भोई, अशोक पाटील, प्रदिप पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.