धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील यांची वार्षिक तपासणी व ग्रामसुरक्षा दल असा संयुक्त कार्यक्रम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी धरणगाव तालुक्यातून आलेल्या ग्राम सुरक्षा दलातील युवकांना धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते ओळखपत्र व काठी, शिटी देण्यात आले.
सुरुवातीला धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी प्रास्ताविक केले. पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील यांनी पोलीस पाटील यांनी केलेले कार्य व ग्रामसुरक्षा दल याबद्दल माहिती दिली. पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पोलीस कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामाबाबत माहिती दिली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ग्राम सुरक्षा दलाला मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सोनवणे यांनी तर आभार धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मानले. त्यानंतर पोलीस पाटलांच्या बैठकीत डॉ. प्रवीण मुंढे यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या व अडचणींबाबत विचारपूस केली आणि प्रवासभत्ता सन २०१२ पासून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.