TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निधीचे योग्य नियोजन करून कामे करा : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

पाळधी येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन; निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव ( शहाबाज देशपांडे) पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांच्या निधीसाठी आपण आजवर कमतरता पडू दिली नसून दोन्ही गावच्या लोकप्रतिनिधींनी विविध योजनांचे अचूक नियोजन करावे असे आवाहन माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथील ७६ लाख रूपयांच्या कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमात बोलत होते. या कामांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, शौचालय बांधकाम आदींचा समावेश आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, माजी पालकमंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आज पाळधी बुद्रुक या गावातील विविध कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून ५६ लाखांचे ४ कामे तर मुलभूत सुविधा म्हणजेच २५/१५ अंतर्गत ३० लाखांची २ कामे अशा एकूण ७६ लाख रूपयांच्या ६ कामांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, पाळधी बुद्रुकच्या सरपंच प्रकाश पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, गट विकास अधिकारी एस. ए. पाटील, बांभोरी प्र. चा. सरपंच सचिन बिर्‍हाडे, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रामपंचायत सदस्य तुषार मोरे, राजाराम कोळी, अकबर खान, उदय झंवर, माजी सरपंच सोपन पाटील, नारायणआप्पा सोनवणे, बांभोेरीचे उपसरपंच चेतन नन्नवरे, स्कूल कमिटीचे चेअरमन संजय महाजन, मच्छूनाना सपकाळे, माजी सरपंच अरूण पाटील, युवा सेनेचे आबा माळी, ग्रामविकास आधिकारी डी. डी. पाठक, मुख्याध्यापक चंदा रवंदळे, उपशिक्षक नबाब सर यांच्यासह दोन्ही गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महाजन यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी केले. आभार उपशिक्षिका मनीषा शिरसाट यांनी मानले. याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी बुद्रुक येथे महिलांसाठी शौचालय बांधकाम : ३० लाख; जि.प. मराठी शाळेत पेव्हर ब्लॉक बसविणे : ०८ लाख; पाण्याची टाकी परिसरात कॉंक्रिीटीकरण करणे : ८ लाख; देवकर कॉलनी परिसरात रस्ता कॉंक्रीटीकरणे करणे १० लाख; गोकुळ धनगर ते सार्वजनीक शौचालय या भागात रस्ता कॉंक्रीटीकरण १० लाख आणि भवानी माता मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक : १० लाख या कामांचे भूमिपुजन करण्यात आले.

*याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या समन्ययातून विकासाला गती मिळत असते. या तिन्ही घटकांनी योग्य नियोजन केल्यास निधीची कोणतीही कमतरता राहत नाही. आधी ग्रामपंचायतींना मर्यादीत निधी येत होता. मात्र अलीकडच्या काळात वित्त आयोगाच्या माध्यमातून चांगला आणि थेट निधी मिळत असून यामुळे ग्रामविकासाला गती मिळाली असल्याचे आ. गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही देखील आमदार गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

मोठी बातमी : प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात धाव ; नेते दिल्लीत दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव मूकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालयात शिघ्रनिदान व उपचार केंद्र स्थापन ! !

October 27, 2020

जळगावची केळी जाणार पाकिस्तानात ; खासदार रक्षाताई खडसेंचे कृषी मंत्र्यांना निवेदन

April 3, 2021

दुर्दैवी ! सख्ख्या बहिण-भावाचा सायकल खेळताना कॅनलमध्ये पडून मृत्यू

April 19, 2022

कारागृहातून सुकेश चंद्रशेखरने घेतली २०० कोटींची खंडणी ; असा होता मास्टरप्लॅन

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group