धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत चंदन दिलीपराव पाटील यांना उमेदवार मोहित प्रकाश पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. माघारीच्या दिवशी वेळ निघून गेली होती. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र. २ मधील उमेदवार मोहित प्रकाश यांनी चंदन पाटील यांना जाहीर पाठींबा दिला. यावेळी अॅड. शरद माळी, भीमराज पाटील,भूपेंद्र पाटील, नामदेव मराठे, दिनेश भदाणे यांच्यासह आदी उपस्थित होते.