पाळधी ता. धरणगाव (शहाबाज देशपांडे) डॉ. मोईज देशपांडे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त झाल्यानंतर आज गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी जितेंद्र गवळी जळगाव जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर डॉ. मोईज देशपांडे यांनी आपली भावना व्यक्त केली की, ही नियुक्ती माझी नसून माझे सर्व सहकारी व पदाधिकारी यांची आहे. मला जे संधी मिळाली आहे. मी संधीच्या सोना नक्की करेन, अशा भावना त्यांनी व्यक्त केली.