जळगाव (प्रतिनिधी) साडेपाच लाख रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या सर्फराज भिस्ती याने ते ड्रग्ज मास्टर कॉलनीत राहणाऱ्या अबरार भिस्ती याच्याकडून घेतल्याची पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तो फरार आहे. त्याला अटक करुन ड्रग्ज विक्रीची साळखी जोडण्यासाठी संशयित सर्फराज भिस्तीला तिसऱ्यांदा दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील शाहू नगरात शहर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे ५३ ग्रॅम मॅफेड्रॉल एमडी ड्रग्जची कारवाई केली. याप्रकरणी संशयित सर्फराज भिस्ती याला अटक करण्यात आली होती. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपासधिकाऱ्यांनी शहरात विक्री होत असलेल्या ड्रग्ची साखळी जोडण्याठी तसेच या गुन्ह्या य संशयितां व्यतरीकत इतर संशयितांच सहभाग आहे का याचा शोध घेण्यासाठ पोलीस कोठडीची मागणी केली होती न्यायालयाने युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर संशयित सर्फराज भिस्ती याला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
संशयिताच्या मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे
अटकेतील संशयित सर्फराज याच्य मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे असल्याच तपासधिकाऱ्यांना संशय आहे. त्याच्याकडे मोबाईलची विचारणा केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच मोबाईल मिळून आल्यास एमडी ड्रग्जची साखळी शोधण्यास मदत होईल.
शोध घेवूनही मिळून आली नाही अबरार जिलाणी
भिस्तीने विक्रीसाठी आणलेले ड्रग्ज त्याने अबरार जिलाणी याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार शहर पोलिसांनी संशयिताचा मास्टर कॉलनी, अक्सानगर, शेरा चौक परिसरात शोध घेतला परंतू तो मिळून आला नसून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. त्याला अटक झाल्यानंतर या गुन्ह्यातील साळखी शोधण्यास पोलिसांना मदत होवू शकते.