जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महेश बुरंगे यांची तर सचिवपदी देवेंद्र कासार यांची निवड झाली.
संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे, उपसरचिटणीस प्रणेश शिरसाठ, कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – अक्षय पाडसवान, कार्याध्यक्ष – गणेश लिधुरे, सहसचिव – सचिन कोळी, श्रीकांत शास्त्री, राकेश पावरा, प्रशांत सोनार, कोषाध्यक्ष – देवेश बाविस्कर, महिला प्रतिनिधी – तन्वी मोरे, निकिता जैन, प्रसिद्धीप्रमुख – सतीश साळवे, सल्लगार – मनोज भराडे. नूतन पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या सभासदांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कॅप्शन : एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय खाडे, उपसरचिटणीस प्रणेश शिरसाठ, कोषाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जळगाव परिमंडलाचे अध्यक्ष महेश बुरंगे, सचिव देवेंद्र कासार यांच्यासह सभासद.