धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भवरखेडे येथील शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात लक्ष्मण प्रभाकर माळी (वय २८ भवरखेडा ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ मार्च २०२२ रोजी घरासमोरील अंगणातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल क्र MH १९ BZ ४२५६ तीचा चेचीस न MBLHA११AE९H४५०८९ व इजीन नं HA EJE९H५०७९१ असून चोरून नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका खुशाल पाटील करीत आहेत.