धरणगाव (प्रतिनिधी) तालाठीच्या बदली च्या मागणीसाठी आज तालुक्यातील आनोरे, धानोरे येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट तहसीलदार कार्यालय गाठले. यावेळी तलाठीची तात्काळ बदली करण्याची मागणी देखील करण्यात आली. तहसिलदारांना जवळपास 100 स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नुकसान भरपाईचे पंचनामे बोगस करण्यात आले आहेत. तलाठी फोन उचलत नाही.मुलांचे शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे मिळत नाहीत. आनोरे,धानोरे गांवात तलाठी येत नाही.त्यामुळे लवकरात लवकर बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी लवकरात लवकर कार्यवाई करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. यावेळी आनोरे, धानोरे येथील सरपंच, उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य, तसेच जवळपास 50 ते 60 शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.