TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या आवाहनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे पावणेअकरा कोटी जमा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याची तसेच आगामी ३ महिने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी १५ मार्च रोजी विधिमंडळात केली होती. त्याबरोबरच महावितरणला आर्थिक अडचणीतून दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिले भरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत खान्देशातील शेतकऱ्यांनी गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे तब्बल १० कोटी ७० लाख रुपये भरले आहेत.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून मिळणाऱ्या निर्लेखन सवलतीमुळे वीज बिलाच्या थकबाकीचा बोजा कमी झाला आहे. यानंतरही जी सुधारित थकबाकी उरली आहे, त्यातील ५० टक्के रकमेचा भरणा ३१ मार्च २०२२ पर्यंत केल्यास उर्वरित थकबाकी माफ होत आहे. त्यामुळे लाखो शेतकरी वीजबिल भरण्यास पुढे आले आहेत. ऊर्जामंत्री ‍डॉ.‍नितिन राऊत यांच्या निर्देशानुसार वीजबिलासह शेतकऱ्यांच्या सर्व वीजविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत विविध गावांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जात आहे.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

दरम्यान, वीज खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची जोडणी पूर्ववत करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी केल्यानंतर खान्देशातील अशा सर्व शेतकऱ्यांची जोडणी पूर्ववत करण्याचे काम महावितरणने युद्धपातळीवर केले. हा दिलासा देतानाच शेतकऱ्यांनी महावितरणला बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी केले होते. या आवाहनाला खानदेशातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित होणार नाही हे माहीत असूनही आपल्याला मिळणाऱ्या विजेपोटी व सेवेपोटी आपण महावितरणचे काही देणे लागतो, या कर्तव्यभावनेतून शेतकरी बिल भरण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे आले. १६ ते २५ मार्च या १० दिवसांत जळगाव जिल्ह्यात ६ कोटी ५७ लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यात २ कोटी ७९ लाख तर धुळे जिल्ह्यात १ कोटी ३४ लाख रुपये शेतकऱ्यांनी कृषी वीजबिलापोटी भरले आहेत.

३१ मार्चपर्यंत थकबाकीमुक्तीची संधी

कृषिपंप वीज धोरणात कृषी ग्राहकांना वीजबिलांत जवळपास ६६ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. सवलत योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत आहे. तसेच कृषी वीजबिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणनच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

धक्कादायक ! पतीला झाडाला बांधून पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बँक खात्यातून २६ लाखांची चोरी ; आयकर विभागात कार्यरत महिलेच्या खात्यावर मारला डल्ला !

February 10, 2025

देवेंद्र फडणवीस यांनी दिला सेनेच्या ‘ या ‘ नेत्यांना इशारा

November 28, 2020

शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शालेय शिक्षणमंत्री गायकवाड

November 4, 2020

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा !

November 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group