TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (CVM) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग आहे. दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान CVM रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन येतो. CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व नियंत्रण करण्यासाठी शेतक-यांनी पुढील काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

सततचे ढगाळ वातावरण, जुन-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान २४-२५ अंश से. असणे, जास्त आर्द्र हवामान, इत्यादी घटक CVM रोगास पोषक असतात. सुरुवातीस कोवळया पानांवर विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकडया होऊन पानांचा आकार लहान होणे, पानाच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोंग्याजवळील पान पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे, इत्यादी लक्षणे CVM रोगात आढळतात.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

CVM विषाणुचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडीच्या माध्यमातुन होतो. CVM विषाणुची जवळ-जवळ १ हजार यजमान पिके येतात. CVM रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापी CVM रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटुन दुर ठिकाणी जाळुन किंवा गाडुन टाकावी. बागेची २/३ वेळा चार ते पाच दिवसांनी नियमित निरिक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही विल्हेवाट लावावी. बागेतील व बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे, रिंगणी, चिलघोल, शेंदाळे, गाजर गवत इत्यादी प्रकारची तणे काढुन बाग स्वच्छ ठेवावी, पिकाची फेरपालट करावी.

केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकाची लागवड करु नये, तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत. मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथेएट ३० ई.सी. २० मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ डब्लु जी. २ ग्राम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. ५ मिली या किटकनाशकांची १० लिटर पाण्यामध्ये मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
Next Post

इकरा शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्युटतर्फे नियुक्ती पत्र वाटप व रोजगार मेळाव्याचे आयोजन !

September 12, 2024

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

January 14, 2026

जळगाव दुध संघ अपहार : आता संचालक मंडळ रडारवर? ; पोलीस जबाब नोंदवण्याची शक्यता !

November 23, 2022

लोकनाट्य कलापथकाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन

March 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group