TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – डॉ. महेश्वर रेड्डी

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

vijay waghmare by vijay waghmare
January 17, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.१७ प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र, श्वान पथक, वायरलेस, पोलीस बॅण्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीपकुमार गावीत, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट सी. एस. नाईक, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया उपस्थित होते. त्यासोबत शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे, रामानंदचे राहुल गुंजाळ, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे अनिल भवारी, मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार, पीएसआय राजेश वाघ यांच्यासह अधिकारी व पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र प्रदर्शना ७००० च्यावर विद्यार्थ्यांनी भेट देऊन पोलीसांशी संवाद साधला आणि शस्त्रां संबंधित माहिती समजून घेतली. हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून जळगावकरांसाठी आयोजित केला जातो. शस्त्र प्रदर्शनातून पोलीस दलाची ओळख झाली. शस्त्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्रसामग्री, उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलातील जबाबदाऱ्या आणि संधींबाबत उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना बीडीएस विभागातील प्रकाश महाजन, नरेंद्र ठाकूर, आशिफ पिंजारी, पंकज सोनवणे, रामदास साळुंखे, राखीव पोलीस दलातील आशिष चौधरी, दीपक पाटील, संतोष सुरवाडे, सुभाष धिरबस्सी, अजित तडवी यांच्यासह क्युआरटी टीम, आरसी प्लाटुन नं.७ मधील कर्मचाऱ्यांनी शस्त्रांविषयी माहिती समजून सांगितली. पोलीस बँड पथकाने विशेष सादरीकरण यावेळी केले.

डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले,”पोलिस दलातील सेवा ही केवळ नोकरी नाही, ती समाजसेवेचे एक मोठे साधन आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून यासाठी स्वतःला तयार करावे.” मोबाईलच्या अतिवापरापासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवावे, तसेच सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. “खोट्या कॉल्सना बळी पडू नका,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटांमधून पोलिसांविषयी जी चुकीची प्रतिमा निर्माण होते, ती बदलण्याचे आवाहन करताना डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, पोलिसांचे खरे काम काय आहे, हे समजून घ्या. पोलिस दल समाजासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

संदीप कुमार गावित व अशोक नखाते यांनीही मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी छोटा पोलीस होऊन मुलांनी पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन केले. विराज कावडिया यांनी उपक्रमाविषयी युवाशक्ती व भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशन यांची भूमिका विशद केली. अरविंद वानखेडे यांनी सायबर क्राईम यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस व शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आभार मानले. सुत्रसंचालन वायरलेस विभागातील अमित माळी यांनी केले. शहर वाहतुक पोलीस दलातील मेघना जोशी, शितल पाटील, वैशाली बाविस्कर, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, सौरभ कुलकर्णी, योगेश कोळी, केवलनाथ, ओम खाचणे, अंजिक्य सपकाळे, रोहन कोळी, मंदार फालक यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.

या शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

नुतन मराठा, नंदिनीबाई बेंडाळे विद्यालय, मू.जे. महाविद्यालय, ला.ना. शाळा मधील एनसीसीचे विद्यार्थी, का.ऊ. कोल्हे महाविद्यालय, भगिरथ स्कूल, ओरियन सीबीएससी व स्टेट बोर्ड, प्रगती स्कूल, पुष्पावती खुशाल गुळवे विद्यालय, न्यु इंग्लीश स्कूल, विद्या इंग्लिश मिडीयम, मनपा शाळा नं. १० ऊर्दू स्कूल, विवेकानंद स्कूल या शाळांसह सुमारे ७००० विद्यार्थ्यांनी दिवसभरात प्रदर्शनीला भेट दिली.

हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली

जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.मधील सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मोटार सायकल रॅली ला हिरवी झेंडी दाखविली. पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरातून निघालेली मोटार सायकल रॅली नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, नेरी नाका, अंजिठा चौफुली, ईच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक मार्ग पोलीस मुख्यालय येथे समारोप झाला. हेल्मेट परिधान करून आमदार सुरेश भोळे, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सह अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन हेल्मेट वापरा विषयी मोटार सायकल रॅलीतून जनजागृती केली.

फोटो कॅप्शन
1. (1) विद्यार्थ्यांना शस्त्राची माहिती देताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधिक्षक संदीपकुमार गावित, जैन इरिगेशनचे सी.एस. नाईक युवाशक्तीचे विराज कावडिया व अधिकारी
2. (RTM09522) शस्त्र, श्वान पथक, बॉम्ब शोध नाशक पथक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सी.एस.नाईक, विराज कावडिया, अशोक नखाते, संदीपकुमार गावीत.
3. (RTM09487) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व्यासपीठावर डावीकडून विराज कावडिया, अशोक नखाते, संदीपकुमार गावित, सी.एस.नाईक
4. (RTM09494) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

विद्या नगरात कुत्र्याच्या वादावरून हाणामारी: तीन नागरिक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

September 11, 2021

जळगाव कृषी विज्ञान केंद्र येथे ग्रामीण युवकांसाठी कुक्कुटपालन -कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात !

October 9, 2023

पोलिस असल्याची थाप मारत भामट्यांनी जळगावात भरदिवसा वृद्धाला २८ हजारांत गंडवले !

April 3, 2023

कामगार सुविधा केंद्रामार्फत हजारो कामगारांचे समुपदेशन

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group