TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैसे दुप्पट अन् सोन्याचे दागिने काढून देण्याच्या बहाण्याने १८ लाखात फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
September 14, 2025
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) मोगरा देवीची शक्ती अंगात असल्याचे भासवून मुलाचे लग्न जमवून देईल, पैसे दुप्पट करून देईल आणि सोन्याचे दागिने काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने १८ लाखात फसवल्याची घटना शहरातील बंगाली फाईल भागात फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडली. या महिलेविरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंगाली फाईलमधील रामवाडी येथील राजेंद्र नारायण माळी याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १२ फेब्रुवारीला त्यांची आई भटाबाई माळी या महादेव मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. तेथे त्यांना मोगरा देवी अंगात येत असलेली मंगलाबाई बापू पवार भेटली. त्यांनी भटाबाईला सांगितले की, तुझ्या घरी लक्ष्मी नाराज आहे, त्यामुळे तुझ्या मुलाचे लग्न जमत नाही. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी २५ हजार रुपये लागतील. भटाबाईने ही गोष्ट घरी सांगितली. त्यानंतर त्यांनी मंगलबाईला पूजा करण्यास सांगितले. त्याच दिवशी रात्री ११ वाजता मंगलाबाई त्यांच्या घरी गेली व तुमच्या घरामागे कानबाईची मूर्ती व सोन्याच्या घागरी आहेत, असे

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

सांगितले. तर ते काढण्यासाठी साडेचार लाख रुपये द्या. त्यामुळे नारायण माळी यांनी दुसऱ्या दिवशी बँकेतून साडेचार लाख रुपये काढून दिले. हे पैसे धान्याच्या कोठीत ठेवावे लागतील, असे सांगत त्या बेडरूममध्ये गेल्यात. तर घरातील सर्वांना बाहेर काढून दरवाजा आतून लावून घेतला. पुन्हा चार दिवसांनी तिने घरामागून तांब्याची घागर काढून आणली व तिच्यात सोन्याचे दागिने आहेत, असे सांगून साडेतीन लाखांची मागणी केली. पुन्हा तीने बेडरूममध्ये जाऊन साडे तीन लाख धान्याच्या कोठीत ठेवले. पुन्हा त्यांनी तिसरी घागर काढून अडीच लाख रुपये मागितले, नंतर चवथी घागर काढून पुन्हा अडीच लाख रुपये मागितले. प्रत्येकवेळी तिने पैसे कोठीत ठेवण्याच्या नावे असे १४ लाख रुपये मागून घेतले. तर पुन्हा मार्च महिन्यात तिने टोपलीतून देवीचा मुखवटा बाहेर काढत अडीच लाख देवीच्या मुखवट्याजवळ ठेवायला लावले. तेही पैसे तीने घरात एकटी जाऊन धान्याच्या कोठीत ठेवल्याचे सांगितले. मात्र, ती पैसे कोठे ठेवत होती, हे घरच्यांना ही माहित नव्हते. तर जून महिन्यात पुन्हा सोन्याच्या घागरी आणि

सोन्याची देवीची मूर्ती काढण्यासाठी पूजेच्या साहित्यासाठी दीड लाख रुपये मागितले. घरमालकाचे पैसे संपले, त्यांनी आम्हाला सोने, दुप्पट पैसे नको म्हणून आमचे पैसे कोठीतून काढून द्या, असे सांगितल. त्यावर मंगलाबाईने तुमच्या घरात पाच फणी नाग आहे, तुम्ही घरात जाऊ नका म्हणून मनाई केली. त्यांनतर मंगलाबाईने माझ्या जादूने व मोगरा मातेच्या कृपेने तुमच्या घरात पैशाचा ढीग लागला असून तो थांबवण्यासाठी पुन्हा ८० हजारांची मागणी केली. पुन्हा त्या ८० हजार घेऊन बेडरूममध्ये गेल्यात. त्याचवेळी दीपक माळी याने आरशातून ती महिला ८० हजार रुपये स्वतःच्या साडीत लपवत असल्याचे पाहिले. यानंतर माळी कुटुंबाने धान्याच्या कोठीत ठेवलेले पैसे पाहिले, परंतु, तेथे काहिच आढळले नाही. फसवणूक झाल्याचे लखात येताच राजेंद्र माळी याने दिलेल्या फिर्यादीवरून मंगलाबाई बापू पवार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उ.नि. समाधान गायकवाड करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहेरुन ५ लाख आणण्यासाठी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ ; धरणगाव पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा !

April 3, 2022

योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी

October 2, 2020

धक्कादायक : तीन सख्ख्या बहिणींची एकत्र गळफास घेत आत्महत्या !

July 28, 2022

दुचाकींची सामोरा-समोर धडक ; दोन तरुण ठार, तिसरा गंभीर !

November 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group