जळगाव (प्रतिनिधी) जळगाव मनपाचे उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित फरार आरोपी जुगल संजय बागुल हा पोलिसांना आज शरण आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
फरार जुगल बागुल हा रामानंद नगर पोलिसांना काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शरण येत पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याला रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.