जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका गॅस सिलेंडर चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून भारत गॅस एजन्सीचे सिलेंडर हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या आदेश व सूचना नुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकातील ASI अशोक महाजन, HC विजयसिंग पाटील, HC विलास पाटील, HC जितेंद्र पाटील, HC सुधाकर अंभोरे, PN नितीन बाविस्कर, PN प्रितम पाटील, PN राहुल पाटील यांनी दि. ५ ते ६ एप्रिल पहाटे ५ वाजेच्या सुमारास राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान जळगाव पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील आरोपी सायबोद्दीन उर्फ सायबु शेख नजमोद्दीन शेख (वय ४१ रा. नशिराबाद ता. जि. जळगाव) अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एका भारतगॅस एजन्सीचे गॅस सिलेंडर हस्तगत करण्यात आले आहे. तसेच आरोपी याची वैद्यकीय तपासणी करून जळगाव शहर पोलीस स्टेशनला मुद्देमालासह पुढील कारवाई कामी हजर केले आहे.