TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदिवासींच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

बोरगाव ता‌. धरणगाव (प्रतिनिधी) राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. खावटी अनुदान योजनेतील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. दरम्यान जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सरकारकडून २४ कोटी रुपयांची मदत मिळणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज आदिवासी खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे बहुतेक जण जेरीस आलेले आहेत. यामुळे आदिवासी समाजासमोरही अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. याची दखल घेत राज्य सरकारने १२ ऑगस्ट २०२०च्या निर्णयानुसार २०१३ पासून बंद पडलेल्या आदिवासी खावटी योजनेला पुनर्जीवीत केले. या योजनेत आधी १०० टक्के अनुदान हे रोख स्वरूपात देण्यात येत होते. मात्र कोविडमुळे उदभवलेल्या स्थितीचा विचार करता, राज्य शासनाने ५० टक्के रोख रक्कम आणि उर्वरित रकमेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने अनूसुचीत जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार हे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार असून दोन हजारांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळणार आहेत.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

जळगाव जिल्ह्यातून खावटी योजनेसाठी ६९९४० अर्ज शासानकडे गेले होते. यातील ६३०७३ कुटुंबे यासाठी पात्र झाले आहेत. यामधील ५९,९२८ लोकांनी प्रत्येकी दोन हजार रूपयांची रक्कम देण्यात आली. अर्थात, जळगाव जिल्ह्यात ११ कोटी ९८ लाख ५६ हजार रूपयांची रोख मदत ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तर प्रत्येकी दोन हजार रूपयांच्या किट वाटपास आजपासून प्रारंभ झाला आहे. याच्या वाटपास आजपासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आदिवासी समुदायाच्या हिताचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कोविड-१९ काळात समाजातील सर्व घटकांवर अतिशय विपरीत परिणाम झाला असून यात आदिवासी समुदायाला मदत व्हावी म्हणून खावटी योजनेत रोख आणि जीवनावश्यक वस्तू यांचा मिलाफ करण्यात आला आहे. या समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून सांगितले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी किट वाटपास प्रारंभ

जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना प्रति कुटुंब चार हजार रुपये अनुदान देण्यात येते त्यात दोन हजार रुपये किमतीचे वस्तू स्वरुपात वाटप व दोन हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. जिल्ह्यातील ५९ हजार ९२८ कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे. खावटी किट मध्ये मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद, डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणा तेल गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती अशा स्वरूपाचे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आलेले असून धरणगाव तालुक्यातील बोरगाव आश्रम शाळेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खावटी किट वाटपास प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, संस्थेचे अध्यक्ष भिकुबाई सोनवणे, सरपंच लक्ष्मण भिल, जनाआक्का पाटील, मुख्याध्यापक मनोज ठाकरे, नितीन पाटील,महेश मराठे, किशोर मराठे, भानुदास पाटील, भैया मराठे, ज्योती सोनवणे यांच्यासह संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविकात आदिवासी प्रकल्प अधिकारी अनिता सोनवणे यांनी खावटी योजना संदर्भात सविस्तर माहिती विशद करून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विकास पवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मनोज ठाकरे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

परभणीत २४ तासात २३२ मिमी पावसाची झाली नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत वावडदा शाळेत वृक्षारोपण

August 3, 2024

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

महिलांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

August 5, 2021

चांदोरकर प्रतिष्ठानकडून ‘पाडवा पहाट’ मैफिलीचे आयोजन !

November 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group