धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलखेडा येथे नुकतीच भव्य बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत ५१ हजाराचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. चाळीसगाव तालुका देवळी येथील जय भद्रा बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.
बिलखेडा येथे नुकतीच बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आलेली होती. या बैलगाडी शर्यतीला पालकमंत्री यांच्यामार्फत 51 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक देण्यात आले होते. बिलखेडा येथील बैलगाडा शर्यतीमध्ये प्रतापराव पाटील साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भगवानभाऊ महाजन, संजूभाऊ, नितीन पाटील, भानुआबा (हिंगोना सरपंच) हे उपस्थित होते.
यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच योगेश भदाणे उपसरपंच दिलीप शांताराम भदाणे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. भदाने गुरुजी, दिपक भदाणे, किशोर भदाने, संदीप भदाने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, बिलखेडा येथे नवीन किराणा दुकानाचे उद्घाटन देखील प्रतापभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.