धरणगाव (प्रतिनिधी) अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माणाचे कार्य सुरू आहे. अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर हे जगातील सर्व हिंदूंच्या आस्था, श्रद्धा व सामुहिक शक्तीचे प्रतीक आहे. यासाठी धरणगाव देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण राष्ट्रीय अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन धरणगावात करण्यात आले.
शोभायात्रेची सुरुवात श्री बालाजी मंदिरापासून श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन जनजातीचे भाईदास बारेला व नुरीबाई बारेला आणि महेश आहेराव व कविता आहेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरणगाव भारतीय जनता पक्षाचे गटनेते कैलास माळी, संतोष सोनवणे, आनंद फुलपगार उपस्थित होते. शोभायात्रेच्या मार्गात धरणगावकरांनी मोठ्या प्रमाणात घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. सजीव देखाव्यांची आरती व पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले. शोभायात्रेच्या मार्गातील महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शोभायात्रेच्या रथात श्रीराम, लक्ष्मण ,सीता व हनुमान यांचे प्रतीकात्मक रूप धारण केलेल्या मुलांनी देखावा सादर केला. यावेळी धरणगाव देवगिरी कल्याण आश्रमाच्या मुलींनी ध्वज-नृत्य सादर केले. तसेच जनजातीचे १०० पेक्षा जास्त रामभक्त स्त्री-पुरुष व बालसंस्कार केंद्राचे मुले सहभागी होते. जनजातीच्या कुटुंबांनी आपल्या पारंपारिक वेशात नृत्य सादर केले तसेच ऐतिहासिक श्रीराम मंदिरासाठी निधी देऊन आपण त्याचे भागीदार व साक्षीदार व्हावे असे जनतेला आवाहन केले. शोभायात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अखिल भारतीय सामाजिक समरसता गतिविधी कार्यकारिणी सदस्य प्रा. रमेश महाजन व मीरा महाजन आणि जनजातीचे भाईदास बारेला व नुरीबाई बारेला यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तसेच प्रभू श्रीरामांच्या आरतीने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक एम. एच. चौधरी, रा. स्व. संघ तालुका कार्यवाह देवेंद्र अत्तरदे, निधी समर्पण अभियानाचे तालुकाप्रमुख किरण भाऊ वराडे, पंकज चव्हाण, देवेंद्र पाटील, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक ,सौ. शोभाकाकू चौधरी,बालकवी शाळेचे मुख्याध्यापक श्री जीवन पाटील व गावकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शिंगाणे यांनी केले. यावेळी त्यांनी भव्य श्रीराम मंदिर निर्माणाचा संकल्प करून प्रत्येक हिंदूला या अभियानासोबत जोडण्याचे अभिवचन देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने दिले. आभार प्रदर्शन मंजूषा पाटील यांनी केले.
शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी धरणगाव देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला प्रमुख मनीषा माळी, सचिव पल्लवी शिंगाणे, कविता आहेराव, मंजूषा पाटील, मिनाक्षी मालपुरे, शितल वानखेडे, स्वाती येवले, माधुरी कुलट, निलीमा येवले, मानसी येवले ,योगिता मुसळे, मीरा अक्का चिंचोरे, रत्ना धुंदेकर, वैशाली पितृभक्त, सुनिता सोनवणे, कविता फुलपगार, अनिल बापू पाटील, ईच्छेश काबरा, विक्रांत वाघ ,राकेश महाजन, भुषण माळी ,जयेश माळी, नंदलाल माळी, शरद बारेला, सुरेश पावरा, प्रताप बारेला, यांनी परिश्रम घेतले.