जळगाव (प्रतिनिधी) श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या उभारणीसाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियाना अंतर्गत शहरात संपन्न झालेल्या श्रीराम प्रदक्षिणा वाहन फेरीत सहभागी सर्व श्रीराम भक्तांचे आतिषबाजी व फुलांचा वर्षाव करत आगळे वेगळे व भव्य स्वागत पांडे चौक येथे युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे करण्यात आले.
या ठिकाणी कुमुद नारखेडे व सहकारी यांनी भव्य अशी स्वागतपर रांगोळी काढली होती यासह आकर्षक अशी स्वागत कमान लावण्यात आली होती. वाहन फेरीच्या समारोप ठिकाणी युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे प्रभूश्रीरामाची सुंदर आरास उभारण्यात आली होती. या ठिकाणी श्रीराम भक्तांची छायाचित्र घेण्यासाठी गर्दी दिसून आली. तसेच सदर आरास राजेश नाईक यांच्या नेतृत्वात युवाशक्तीच्या स्वयंसेवकांनी साकारली. यासाठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, प्रीतम शिंदे, अमोल गोपाळ, चेतन बारी, पवन चव्हाण, हितेश सूर्यवंशी, उमाकांत जाधव, प्रशांत वाणी, राहुल चव्हाण, प्रकाश कावडीया, प्रदीप जनबंधू, पियुष हसवाल, मनोहर चव्हाण, सांडीओ सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.