TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे क्रांतीज्योती सवित्रीमाईंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

फुले दांपत्यांच्या जीवन कार्यातून जगण्याची प्रेरणा घ्या !.. - व्याख्याते लक्ष्मण पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) श्री संत सावता माळी युवक संघ धरणगाव व सावित्रीमाई फुले चौक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन, ग्रंथ भेट व वैचारीक प्रबोधनातून माईंना अभिवादन करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहुजन समाजातील शेतकरी महिला, माता -भगिनी यांच्या हस्ते विद्येची खरी देवता – स्फूर्तीनायिका – आद्य कवयित्री – शिक्षणतज्ञ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व क्रांतिसूर्य, शिक्षणक्रांतीचे जनक – सत्यशोधक -राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी माईंसाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. लोकशाहीवर वामन कर्डक यांचे स्त्री जातीच्या मुक्तीसाठी… आणि पहिली माझी ओवी… या गीतांमधून सावित्रीमाईंचे कार्य विशद केले. आज ज्या सर्व महिला सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या याचे श्रेय केवळ सावित्रीमाई फुले यांनाच जाते. माईंच्या जीवनातील बऱ्याच प्रसंगांमधून क्रांतीज्योती सावित्रीमाईंचे शैक्षणिक – सामाजिक कार्य विस्तृतपणे सांगितले. खूप मोठे व्हा, प्रगती करा, नाव कमवा परंतु फुले दाम्पत्यांचे उपकार कधीही विसरू नका, असे भावनिक आवाहन लक्ष्मण पाटील यांनी केले.

READ ALSO

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

या दिवसाचे औचित्य साधून उपस्थित माता- भगिनींना श्री. संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सावित्रीमाई फुले यांचे जीवन चरित्रपर ग्रंथ भेट स्वरूप देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते लक्ष्मण पाटील यांना संत सावता महाराज यांच्या जीवन कार्याचा ग्रंथ भेट देण्यात आला. मनोज माळी यांना चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन यांच्या हस्ते अनमोल ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबादादा महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष – व्ही.टी.माळी, सहसचिव – डिंगबर महाजन, व्याख्याते लक्ष्मण पाटील, महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील, श्री. संत सावता माळी युवक संघटनेचे जिल्हा सल्लागार विनायक महाजन, तालुकाध्यक्ष निलेश माळी, आदर्श शिक्षक कैलास वाघ, गजानन महाजन, श्रीकांत महाजन, योगेश महाजन, विक्की महाजन, आप्पी माळी, मनोज अशोक महाजन, घनश्याम पाटील, गजानन महाजन,नितेश महाजन, नितीन महाजन तसेच सावित्रीमाई फुले चौकातील सर्व सन्माननीय समाजबांधव व महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमात कोविड – १९ च्या शासन नियमांचे पालन करण्यात आले. फिजिकल डिस्टनसिंग, मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींची दक्षता घेण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संत सावता माळी युवक संघ धरणगाव व सावित्रीमाई फुले चौक यांच्या सर्व पदाधिकारी व युवक मित्रांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संत सावता माळी युवक संघाचे जिल्हा सल्लागार विनायक महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
Next Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमळनेर येथील पाडळसरे धरणासाठी १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2022

उज्ज्वला योजनेतंर्गत गॅस कनेक्शन देण्याच्या नावाखाली जळगावात महिलांची फसवणूक !

October 22, 2023

नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

November 13, 2020

उज्जैन येथे सहकार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक उत्साहात !

February 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group