जळगाव (प्रतिनिधी) कोरोना लसीकरण दरम्यान, ३१ जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पल्स् पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवार, दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स् पोलीओ लसीकरण मोहिम रविवार, दि. ३१ जानेवारी, २०२१ रोजी राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार, दूरचित्र वाहिन्यांचे कॅमेरामन यांनी उपस्थित रहावे. असे जिल्हा माहिती अधिकारी यांनी कळविले आहे.