TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुणरत्न सदावर्ते पुन्हा जेलमध्ये ; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवली

सदावर्तेंनी फोन केलेली नागपूरमधील ती व्यक्ती कोण? ; वकिलांचा खळबळजनक दावा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अॅड गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टाने आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सदावर्तेंनी हल्ल्याच्या दिवशी नागपूरमध्ये दोन फोन केले, असा खळबळजनक दावा जामिनावरच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिल अॅड प्रदीप घरत यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी रविवारी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आले असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. ही झडती सुमारे सात ते आठ तासांपासून सुरू असल्याचं सांगितलं जातंय.

सदावर्तेंनी हल्ल्याच्या दिवशी नागपूरमध्ये दोन फोन केले

दरम्यान, त्यांच्या जामिनावरच्या सुनावणी दरम्यान अनेक खळबळजनक दावे सरकारी वकिलांनी केलेत. सदावर्तेंनी हल्ल्याच्या दिवशी नागपूरमध्ये दोन फोन केले, असा दावा सरकारी वकिल अॅड प्रदीप घरत यांनी केला. सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी करत अॅड प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांच्या चौकशीत आणखी ४ जण या घटनेत गुंतलेले आहेत अशी माहिती कोर्टात दिली.

सदावर्ते चौकशीला पूर्णपणे सहकार्य करत नाहीत, तसंच चंद्रकांत सूर्यवंशी याचं नाव चौकशीत समोर आल्याचं अॅड प्रदीप घरत यांनी सांगितलं. सदावर्ते यांनी मीडियाला आपल्या योजनेची माहिती दिली होती. त्याच दिवशी सदावर्ते यांनी सकाळी नागपूरला एक कॉल केला होता. कोणाला फोन केला हे शोधून काढायचं आहे, असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.

धक्कादायक म्हणजे या हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याचं ठरलं होतं. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावलं, याप्रकरणी चार जणांचा ताबा पाहिजे असंही अॅड प्रदीप घरत यांनी सांगितलं.

बाहेरून कोण पाठींबा देत आहेत का? याबाबत अधिक चौकशी करायची आहे, सदावर्ते यांच्या मोबाईलवरून 31 मार्चला बोलणं झालं, मात्र त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ते सिमकार्ड त्यांनी नष्ट केलं, ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी 11.35 वाजता सदावर्ते यांनी नागपूरला whtsapp कॉल केला, त्यानतंर परत 1.30 त्यांनी नागपुराला पुन्हा कॉल झाला, आणि पत्रकार पाठवा असे ते कॉलमध्ये म्हणाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेले सहा महिने संप सुरु असून यासाठी पैसे कुठन येतायत याचा तपास करायचा आहे असं अॅड प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितलं.

नेमकी काय होती घटना

एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतात बत्ती गुल होण्याची शक्यता?, तज्ज्ञांनी दिला इशारा ; जाणून घ्या कारण

October 3, 2021

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

August 21, 2021

Weekly Horoscope साप्ताहिक राशिभविष्य – 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2024 !

September 15, 2024

Horoscope Today: Thursday, 29 September 2022 : आजचं राशीभविष्य, गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ !

September 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group