पाळधी (शहाबाज देशपांडे) धरणगाव तालुक्यातील पाळधी पोलीस चौकी व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई सुमारे ७३ लाख २२ हजार प्रतिबंधित गुटखा वाहतुकीसाठी वापरणारे कंटेनर जप्त करण्यात आला. या कारवाईत परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी दुपारी मिळालेली गोपनीय माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावर पाळत ठेवली होती. प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा एक कंटेनर येत असल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी तो थांबविण्याच्या प्रयत्न केला. मात्र चालकांनी कंटेनर ना थांबता पुढे पळ काढल्याने पोलिसांना त्याचा पाठलाग केला. अखेर सावदे तालुका. एरंडोल शिवारात कंटेनर पकडण्यात आला.
कंटेनर पाळधी पोलीस चौकीत आणल्यानंतर तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आढळून आला . त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यात १२८ गोण्या प्रतिबंधित गुटख्याचे आढळून आले असून त्याचे अंदाजे किंमत ४८ लाख २२ हजार २६४ रुपये आहे . तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनरची किंमत २५ लाख रुपये असून एकूण ७३ लाख २२ हजार २६४ रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रदीप बटू पाटील . वय (४९) याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पाळधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे, एएसआय राजाराम सुरवाडे, योगेश सोनवणे, वसंत निकम, संदीप खंडारे, प्रवीण चौधरी, मोहन पाटील, रमेश सूर्यवंशी, भरत पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख आणि रवी कापडणे यांचे पथकाने कारवाई केली. यावेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी भेट देऊन कारवाईची पाहणी केली. पाळधी पोलीस चौकीच्या हद्दीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा विरोधात कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
















