TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवझिरी शासकीय आश्रमशाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर !

समाजकार्य महाविद्यालय व वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2023
in आरोग्य, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भगिनी मंडळ चोपडा संचलित, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा व वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले.

समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू तृतीय वर्ष व एमएसडब्ल्यू द्वितीय वर्ष क्षेत्रकार्याच्या वैजापूर व मुळ्यावतार गटाचे क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी व प्रा. नारसिंग वळवी यांच्या लक्षात आले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्यांनी सदर शिबिराचे आयोजन केले. सदर शिबिरासाठी वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा अधिकारी राजेंद्र रनाळकर व महालॅब तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे यांनी बहुमोल असे सहकार्य केले.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

सदर शिबिराच्या आयोजनाचे नियोजन क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ.प्रा. आशिष गुजराथी व प्रा. नारसिंग वळवी यांनी केले. यावेळी राजेंद्र रनाळकर यांनी विद्यार्थ्यांना रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाचे महत्त्व काय व ते किती असावे, ते संतुलित ठेवण्यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये ४५ मुले व ४० मुलींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. या शिबिरासाठी आश्रम शाळेतील शिक्षक एस.एम.सुरवाडे, सी.जी.बारेला, ए.आर.पावरा, आर.बी.बारेला, एम.झेड‌.बारेला, सी.जी.बारेला व शिपाई के.के.पावरा यांनी विशेष सहकार्य केले.

तसेच वैजापूर क्षेत्र कार्य गटातील विद्यार्थी दुर्गेश पावरा, हिमानी पाटील, विशाल भालेराव, वैष्णवी धनगर, संदीप पावरा व मुळ्यावतार क्षेत्र कार्य गटातील अजित भिल, दिपाली रामोशी, नेहा देशमुख, लोकेश गवळी, अरुण भोई, अश्विनी धनगर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शिबिराची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वैजापूर गावातील आशा वर्कर व ग्रामस्थांना मागील क्षेत्र कार्यात नोंदणी केलेल्या आभा कार्डचे वितरण केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीने केला पतीचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वॉटरग्रेस कंपनी व कामकाजाची चौकशी करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी दिले आयुक्तांना पत्र

December 23, 2020

खळबळजनक : जळगावात व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड असलेली बॅग लांबवली !

January 24, 2023

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे !

December 1, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२३ !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group