धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी अखिल भारतीय माळी समाजाचे ग्रामीण युवक जिल्हा अध्यक्ष अनिल हिरालाल माळी यांच्या अध्यक्षतेखाली व निलेश महाजन यांच्या सोबतीने निलेश रमेश महाले, भूषण संजय पारधी, प्रदीप रवींद्र पाटील, योगेश भिकन मराठे, गणेश नामदेव माळी, अशोक अनिल पाटील, समाधान राजू महाजन, किरण रामभाऊ मराठे, रवींद्र नामदेव माळी, कैलास भगवान चौधरी, दिगंबर सुरेश महाजन, पवन राजू महाजन, भरत संजय महाजन, विकी सुपडू घिसाडी, रितेश अनिल पाटील, आकाश दिलीप पारधी, अंकित रमेश माळी, निलेश राजेंद्र पारधी, ज्ञानेश्वर अमृत पारधी, आनंद भरत साळुंखे, संजय अनिल गोंधळी, सचिन कैलास पारधी, अविनाश नारायण पारधी, राहुल अशोक नाईक, राहुल एकनाथ खलसे, सुनील शांताराम पारधी, राजा अभिमन ठाकरे, युवराज शिवदास ठाकरे, अश्विन छोटू पवार यांनी प्रेवश केला. यावेळी उपस्थितमध्ये युवासेनेचे अमोल पाटील दोनगावकर, आबा माळी, नवल पारधी, नाटेश्वर पवार उपस्थित होते.