धरणगाव (प्रतिनिधी) शहराच्या हद्दीत सार्वजनिक किंवा खाजगी इमारतीवर नगरपरिषदेच्या विनापरवानगी कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावल्यास कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेश धरणगाव नगरपालिका मुख्याधिकारी जनार्धन पवार यांनी काढले आहेत.
धरणगाव शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की, धरणगाव शहराच्या हद्दीत सार्वजनिक किंवा खाजगी इमारतीवर नगरपरिषदेच्या विनापरवानगी कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावल्यास महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५, नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्वांनी सुस्पष्ट नोंद घ्यावी. सर्व व्यावसायिकांना सुचित करण्यात येते की आपल्या व्यवसायाचे नाव याव्यतिरिक्त इतर कोणतेही बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश धरणगाव नगरपालिका मुख्याधिकारी जनार्धन पवार यांनी काढले आहेत.