बोदवड (प्रतिनिधी) शहरात तहसील कार्यालय जवळ परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एकाजवळ गावठी कट्टा सापडला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
या बाबत माहीती अशी की, जामनेर रस्त्यावरील तहसील कार्यालय जवळपास एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असून त्याच्या जवळ गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना दि.२२ रोजी सायंकाळी मिळाली होती. पोलीस निरिक्षक व पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचुन न.ह.राका हायस्कुल समोर रात्री आठचे सुमारास जामनेर रोडने एक इसम हा संशयास्पदरित्या फिरतांना दिसला. सदर इसमावरती संशय बळावल्याने त्यास पोलीसांनी अडवुन विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तर देत असल्याने पोलीस निरिक्षक राजेंद्र गुंजाळ व सहा पोलीस निरिक्षक अंकुश जाधव यांनी त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक दादाराव शेजोळे (वय- 22 वर्ष, रा. येवती ता. बोदवड ह.मु. नानेकरवाडी, चाकण, पुणे) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ 1)१५००० रु. किं.ची एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅकझीन सह व 2)५००- रु. किं. १ जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यास तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे विरुध्द बोदवड पोलीस स्टेशनला भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे क. ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक, .एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रताप शिकारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ,स.पो.नि. अंकुश जाधव, पोकॉ मुकेश पाटील, पोकॉ भगवान पाटील, पोकॉ निखिल नारखेडे,निलेश सिसोदे यांनी केलेली आहे.















