साळवा ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साळवे ग्रामपंचायतीत साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, व ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती.
















