TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

आ. मंगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचे मान्यवरांनी केले कौतुक

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2026
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगावच्या विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडत आ. मंगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन २७ रोजी सायंकाळी ६ वाजता नवीन पंचायत समिती कार्यालयात उत्साहात व जल्लोषात पार पडले. या वेळी मान्यवरांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या या विकासाच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.

कार्यक्रमास जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रादेशिक विभाग नाशिकच्या वरिष्ठ अधिकारी अरुंधती शर्मा, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अधीक्षक अभियंता राहुल पाटील, सहाय्यक जिल्हा निबंधक मंदार कुलकर्णी, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. सुपे, रणधीर सोमवंशी, प्रशांत पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती किशोर पाटील, उपसभापती राहुल पाटील, भाजपच्या नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण, उपनगराध्यक्षा हर्षल चौधरी, गटनेते प्रशांत कुमावत, भाजपचे नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, माजी सदस्य, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या चाळीसगाव शहर, सायगाव, मेहुणबारे व वाघळी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. तर चाळीसगावच्या विकासाची वारी, आनंदाची घरोघरी या संकल्पनेतून विकासाचा हा प्रवास पुढेही सुरू राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तर नवीन शासकीय कार्यालये, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने तसेच पाणीपुरवठा व आरोग्य सुविधांशी संबंधित प्रकल्पांमुळे नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. या विकासकामांमुळे चाळीसगावच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी या प्रसंगी व्यक्त केली.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

या कामांचा आहे समावेश

या वेळी चाळीसगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रायगड व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह, प्रांताधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी तसेच तहसीलदार निवासस्थान, नोंदणी सेवा तीर्थ सह दुय्यम निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच नवीन टाकळी प्र.चा. पाणीपुरवठा योजना आदी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ९.३९ कोटी रुपये, रायगड व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृहासाठी ६.४ कोटी रुपये, प्रांताधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या निवासस्थानासाठी १.६५ कोटी रुपये, तसेच इतर विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonInauguration and Groundbreaking Ceremonies for Various Development Works in Chalisgaon

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

November 8, 2021

मोठी बातमी : राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक !

September 7, 2022

बोदवड नगरपंचायत निकाल : जाणून घ्या…प्रभाग निहाय कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते !

January 19, 2022

आजीचे चोरलेले दागिणे विकण्यापूर्वीच नातूला अटक !

October 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group