जळगाव (प्रतिनिधी) विकेल ते पिकेल योजनेंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियानांतर्गत फळे व भाजीपाला विक्री केद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत ४ जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयात फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, ४ जानेवारी, २०२१ रोजी सकाळी १० वाजता गट क्रमांक २७२, पोलीस निवास, खुली जागा, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.