TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वतंत्र प्रभाग समिती कार्यालयासाठी पाठपुरावा करणार; उपमहापौर सुनील खडकेंची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून प्रभाग समिती कार्यालयांचे बळकटीकरण नसल्याने सर्व भार मनपावर पडत आहे. प्रत्येक प्रभाग समितीचे कार्यालय स्वतंत्र असावे अशी मागणी नगरसेवकांनी केली असता त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपमहापौर सुनील खडके यांनी दिले.

‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १२ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक अनंत जोशी, नितीन बरडे, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, चंदन महाजन आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

पार्वतीनगरातील मोकळ्या जागेचे सपाटीकरण करा

पार्वती नगरातील झोराष्ट्रीयन हॉलजवळ असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेवर मुरूम आणि खडक पडून आहेत. तसेच जागोजागी गवत उगवले असून जागा ओबडधोबड झाली असल्याची तक्रार नागरिकांनी केली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देत आजच्या आज जेसीबीच्या साहाय्याने जागेचे सपाटीकरण करण्याचे सांगितले. पार्वती नगरातील एका कुटुंबात एका व्यक्तीचे नुकतेच कोरोनाने निधन झाले असून घर तसेच परिसर सॅनिटाईज केला नसल्याचे त्या कुटुंबियांनी सांगितले. उपमहापौरांनी त्या कुटुंबियांचे सांत्वन करून लागलीच आरोग्य विभागाकडून घर आणि परिसर निर्जंतुक करण्याच्या सूचना केल्या.

गिरणा टाकी परिसरात कायम स्वरूपी मनपा कर्मचारी नेमावे

गिरणा पंपिंग स्टेशनच्या पाण्याच्या टाक्या जीर्ण झाल्या असून एक टाकी उघडी असल्याने ती धोकेदायक आहे. काही दिवसांपूर्वी एक महिला आपल्या मुलासह त्याठिकाणी आत्महत्त्या करण्यासाठी आली असल्याची बाब नगरसेवकांनी लक्षात आणून दिली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच अधिकाऱ्यांना सूचना देऊन गिरणा टाकी परिसरात कायम लक्ष देण्यासाठी मनपाचा एक कर्मचारी नेहमी असावा असे सांगितले.

अमृत योजनेच्या मक्तेदार प्रतिनिधीची कानउघडणी

नवीन पोस्टल कॉलनी, भूषण कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी अमृतच्या चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी चाऱ्या बुजविण्यात आल्या नाही तर काही ठिकाणी नळ संयोजन देणे बाकी असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी तात्काळ मक्तेदार प्रतिनिधीला बोलावून त्याची कानउघडणी केली. तसेच चाऱ्या लवकरात लवकर बुजवून रस्ते करावे. भूषण कॉलनीतील मुख्य रस्त्यावरील माती बाजूला करून रस्ता मोकळा करावा आणि चाऱ्या सपाटीकरण करून नागरिकांना लागलीच नळ संयोजन द्यावे, अशा सूचना केल्या.

मोकळ्या जागा विकसित करा, रस्ते दुरुस्त करा

शास्त्री नगर परिसरातील ओपन स्पेस विकसित करावी, प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी दिल्या. तसेच नूतन अजिंठा हौसिंग सोसायटी, पार्वती नगरातील मुख्य रस्ता डागडुजी करावी असेही ते म्हणाले. श्रद्धा कॉलनीतील तीन विद्युत खांब समोरील बाजूस स्थलांतरित करावे अशी मागणी नागरिकांनी केली असता त्याबाबत महावितरणकडे पाठपुरावा करावा असे सांगितले तसेच मनपाकडून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले.

नगरसेवकांकडून फटाके फोडून स्वागत

प्रभाग १२ मध्ये दौरा करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके पोहचले असता शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे आणि अनंत जोशी यांनी फटाके फोडून स्वागत केले. तसेच उपमहापौरांना पुष्पगुच्छ देत संपूर्ण प्रभागाची माहितीही स्थानिक नगरसेवकांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
Next Post

घरकुलाचा नाविन्यपूर्ण सुसज्ज आणि गुणात्मक प्रकल्प राबवा ; आ. अनिल पाटील यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 जून 2024 !

June 8, 2024

जळगाव तालुका भाजपा वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. पंकज इंगळे यांची निवड !

November 11, 2021

मोठी बातमी : राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ईडीकडून अटक !

September 7, 2022

हिताची कंपनीतून सोलारच्या साहित्यांची चोरी ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

September 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group