धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे झुडुपांमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून अर्भक अनैतिक संबंधातून टाकून दिले असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे आज झुडुपांमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्याने गावकर्यांना तेथे धाव घेतली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. येथे टाकून दिलेले अर्भक हे नवजात नसून ते तीन-चार दिवसे वयाचे असल्याचे जाणकारांना आढळून आले. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने या अर्भकाला धरणगाव पोलीस स्थानकाच्या स्वाधीन केले असून तेथे याबाबत नोंद करण्याचे काम सुरू आहे. तर या अर्भकाबाबत कुणाला माहिती असल्यास धरणगाव पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.